लोकसभा निवडणुकीचा आजपासून तिसरा टप्पा; 11 लोकसभा मतदारसंघांत उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ | पुढारी

लोकसभा निवडणुकीचा आजपासून तिसरा टप्पा; 11 लोकसभा मतदारसंघांत उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील तिसर्‍या टप्प्यास शुक्रवार, 12 एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. या टप्प्यात राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघांत उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होत असून, येथे 7 मे रोजी मतदान होणार आहे.

सातारा, माढा, कोल्हापूर, हातकणंगले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद (धाराशिव), बारामती व रायगड या 11 मतदारसंघांत ही निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. यापैकी लातूर व सोलापूर हे दोन मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. शुक्रवार, 12 एप्रिल रोजी केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे या 11 जागांवर लोकसभा निवडणुकीबाबत अधिसूचना जारी करण्यात येईल व यासोबतच उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल.

द़ृष्टिक्षेपात तिसरा टप्पा

एकूण जागा : 11, अधिसूचना जारी होण्याचा दिनांक : 12 एप्रिल, उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस : 19 एप्रिल, अर्जांची छाननी : 20 एप्रिल, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस : 22 एप्रिल. मतदानाचा दिवस : 7 मे.

Back to top button