Lok sabha election 2024 : राज ठाकरेंना अमित शहांनी कोणती फाईल दाखवली? संजय राऊत यांचा खोचक सवाल | पुढारी

Lok sabha election 2024 : राज ठाकरेंना अमित शहांनी कोणती फाईल दाखवली? संजय राऊत यांचा खोचक सवाल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मनसेचा अचानक नमो निर्माण पक्ष कसा तयार झाला?. राज ठाकरेंनी मुंबईत येताच भूमिका कशी बदलली?. महाराष्‍ट्राच्‍या शत्रूंना पाठिंबा द्‍यावा असे का वाटले?. राज ठाकरेंना शहांनी कोणती फाईल दाखवली?, अशी प्रश्‍नांची मालिकाच उपस्‍थित करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्‍यावर टीका केली.

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी (९ एप्रिल) शिवतीर्थावर झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात केली. या निवडणुकीच्या रिंगणात मनसे उतरणार नाही, असे सूचित करताना विधानसभेच्या तयारीला लागा, असे आवाहन त्यांनी मनसैनिकांना यावेळी केले होते.

राज्‍याने ओवाळून टाकलेल्‍या भ्रष्‍टाचारींना भाजपने बरोबर घेतले

राज ठाकरे यांच्‍या भूमिकेवर माध्‍यमांशी बोलताना संजय राऊत म्‍हणाले, राज्‍याने ओवाळून टाकलेल्‍या भ्रष्‍टाचारी भाजपने बरोबर घेतले आहेत. महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना आताच भूमिका कशी बदलावी वाटली. महाराष्‍ट्राच्‍या महाराष्‍ट्राच्‍या शत्रूंना पाठिंबा द्‍यावा असे का वाटले?. नुकतीच राज ठाकरे यांनी दिल्‍लीत जावून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. यावेळी शहा यांनी राज ठाकरे यांना कोणती फाईल दाखवली? त्‍यामुळे त्‍यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्‍याचा निर्णय घेतला, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

हेही वाचा : 

 

Back to top button