संजय राऊतांनी गरिबांची २०० ग्रॅम खिचडी चोरली : संजय निरुपम | पुढारी

संजय राऊतांनी गरिबांची २०० ग्रॅम खिचडी चोरली : संजय निरुपम

पुढारी ऑनलाईन डेस्क : संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे सूत्रधार आहेत, असा आरोप संजय निरुपम यांनी आज केला. ते प्रसारमाध्यमांसमोर बोलत होते. यावेळी त्यांनी अमोल कीर्तीकरांवर कारवाई व्हावी, अशी मागणी माजी खासदार संजय निरुपम यांनी केली.

संजय निरुपम म्हणाले, जेव्हा ते पत्राचाळ घोटाळ्यात पकडले गेले, तेव्हा त्यांनी आपल्या पत्नीच्या नावे लाच घेतली होती. आणि खिचडी घोटाळ्यातही राऊतांनी गरिबांची २०० ग्रॅम खिचडी चोरली. राऊतांनी मुलगी , भाऊ आणि भागीदारांच्या नावे पार्टनर यांच्या नावे पैसे घेतले. कोविड काळात सह्याद्री रिफ्रेशमेंट या कंपनीकडून संजय राऊतांच्या कुटुंबीयांनी १ कोटींची दलाली घेतली.

निरुपम म्हणाले, संजय राऊत यांची मुलगी ही माझ्या मुलीसारखी आहे. तिला माहितीही नसेल की, सह्याद्री रिफ्रेशमेंट काय आहे. ती मुलगी निर्दोष आहे. तिचे नाव विदिता संजय राऊत तसेच त्यांचे भाऊ संदीप राऊत यांच्या नावे चेकने पैसे संजय राऊत यांनी घेतले. सुजित मुकूंद पाटकर हा संजय राऊत यांचा भागिदार आहे, त्याच्या अकाऊंटमध्येही लाखात पैसे जमा झाले आहेत.

३३ रु. त ३०० ग्रॅम खिचडी मोफत देण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते. गरीब लोक, मजूर लोकांना हा अन्न पुरवठा करण्याचे कॉन्ट्रॅक्ट बीएमसीने सह्याद्री रिफ्रेशमेंटला दिले. सब कॉन्ट्रॅक्ट जे दिले जे १६ रु. १०० ग्रॅम पुरवठा करण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले गेले. म्हणजे, गरीब लोकांचे पर पॅक २०० ग्रॅम खिचडी गायब केली गेली. सह्याद्री रिफ्रेशमेंटने यामध्ये मोठा घोटाळा केलाय. मजेशीर गोष्ट म्हणजे या कंपनीत कदम नावाचा कुणी व्यक्ती नाही. पण कारारात हे नाव समोर येते.

जोगेश्वरी एसपी रोडवरील एक खासगी रेस्टॉरेंटचे किचन आपले असल्याचे सांगून खिचडी करार करण्यात आला. नंतर पर्शियन दरबार रेस्टॉरेंटच्या मालकाला बोलावण्यात आले, तेव्हा त्याने सांगितले की, आमच्यासोबत कोणताही करार झालेला नाही. त्या मालकाने ॲफिडेव्हिट दिला आहे की, सह्याद्री रिफ्रेशमेटशी आमचा कोणताही संबंध नाही, आमच्या रेस्टॉरेंटमध्ये कोणेतही अन्न शिजवले गेले नाही. याचा अर्थ सह्याद्री रिफ्रेशमेंटने मोठा घोटाळा केलाय. कोविड काळात लोकांचा जीव जात होता, लोकांकडे अन्न-पाणी नव्हते, मजुरांकडे, लोकांकडे गावाकडे जाण्यासाठी गाडी नव्हती, पैसे नव्हते, त्यावेळी शिवसेनेचे लोक अन्न पुरवठ्यात केला जात होता, त्यात घोटाळा करत होते. खिचडी घोटाळ्याचा तपास विस्ताराने व्हावा, संजय राऊत यांना अटक करावी. खिचडी चोराविरोधात कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी निरुपम यांनी केली.

Back to top button