

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात आपल्याला भ्रष्टाचाराविरोधात लढायचे आहे, असे म्हणतात; पण देशातील सर्व भ्रष्टाचारी नेत्यांना मोदी भाजपमध्ये घेत आहेत. त्यामुळे मोदी भ्रष्टाचाराशी कसे लढणार, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. (Lok Sabha elections 2024)
तपास यंत्रणांचा गैरवापर करत विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे, विरोधकांचा आवाज दडपण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. त्यामुळे आता जनतेलाही खरे रूप कळले आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली. (Lok Sabha elections 2024)