omicron variant tension : शाळा सुरु होण्याला पुन्हा ब्रेक ? ठाकरे सरकार कोणता निर्णय घेणार | पुढारी

omicron variant tension : शाळा सुरु होण्याला पुन्हा ब्रेक ? ठाकरे सरकार कोणता निर्णय घेणार

मुंबई; पुढारी ऑनलाईन

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने साधारणपणे गेल्या २ वर्षांपासून बंद असणाऱ्या ऑफलाईन शाळा १ डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र, आता कोरोनाचा ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटची पुन्हा एकदा धडकी भरली आहे. (omicron variant tension)

ओमिक्रॉन हा अत्यंत घातक व्हेरिएंट असल्याने या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करायच्या की नाही याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याबाबत आज कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे शाळा सुरु होण्याला पुन्हा ब्रेक ? लागणार की नाही यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (omicron variant tension)

आज सोमवारी सकाळी 10 वाजता ही बैठक सुरु होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितील ऑनलाईन बैठक पार पडणार आहे. या बैठकीत शाळा सुरू करण्यासह इतर महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

omicron variant tension : शाळा सुरु होण्याला पुन्हा ब्रेक ?

1 डिसेंबरपासून राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या एन्ट्रीने शाळा सुरू होणार की नाहीत यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

मुंबई महापालिका क्षेत्रात शाळा सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका शिक्षण विभागाच्यावतीने आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासमोर सादर केला जाणार असून मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

केंद्राच्या आदेशाची वाट पाहू नका, कामाला लागा

ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची सर्व बंधने पाळावी लागतील, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिली. दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमीक्रॉनमुळे अनेक देशांत चिंता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी बैठक घेतली.

ठाकरे यांनी कोविडच्या नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे त्या सर्व उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या. केद्र सरकारच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा, असे आदेश दिले आहेत. मुबंईसह राज्यातील सर्व विमानतळांवर कडेकेकोट बंदोबस्त ठेवा. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करून गरज भासल्यास त्यांना क्वारंटाइन करा. पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची सर्व बंधने पाळावीच लागतील, असे ते म्हणाले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह आरोग्य विभागाचे सचिव या बैठकीला उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button