राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ची सुरक्षा वाढवावी; वडेट्टीवार, थोरात यांनी घेतली रश्मी शुक्लांची भेट | पुढारी

राहुल गांधींच्या 'भारत जोडो'ची सुरक्षा वाढवावी; वडेट्टीवार, थोरात यांनी घेतली रश्मी शुक्लांची भेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड आज पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. राज्यात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेसाठी सुरक्षा वाढवण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली. मणिपूरमधून १४ जानेवारी रोजी भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात झाली होती. आणि १७ मार्चला मुंबईमध्ये समारोप होणार आहे. महाराष्ट्रमध्ये राहुल गांधी यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रश्मी शुक्ला यांची विजय वाडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड आज रश्मी शुक्ला यांची भेट घेतली.

काँग्रेस नेते राहुल गांधी लोकसभा निवडणुकीआधी भारत जोडो न्याय यात्रा करत आहेत. दरम्यान, त्यांची यात्रा गुजरातमध्ये आहे. सध्या या यात्रेतून त्यांनी ब्रेक घेतला आहे. राहुल गांधी दिल्ली जात आहेत. दिल्लीमध्ये आज काँग्रेसची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. अशा परिस्थितीत ११ मार्चला यात्रेला विराम असेल. काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी याबाबत मीडियाला माहिती देताना सांगितले की, भारत जोडो यात्रा ११ मार्चला विश्राम असेल. १२ मार्च रोजी दुपारी १ वाजल्यापासून ही यात्रा पुन्हा सुरू होईल.

 

Back to top button