जागावाटपाबाबत लवकरच निर्णय घेऊ : देवेंद्र फडणवीस | पुढारी

जागावाटपाबाबत लवकरच निर्णय घेऊ : देवेंद्र फडणवीस

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागा वाटप लवकरच निर्णय घेऊ, थोडी प्रतीक्षा करा, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की, गडकरींचे नाव पहिल्या यादीत नसल्यामुळे उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही आमच्या पक्षात घेतो. यावर काय मत आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, ज्या पक्षाचा बँडबाजा वाजला आहे, त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरींसारख्या राष्ट्रीय नेत्याला ऑफर देणे म्हणजे, एखाद्या गल्लीतल्या व्यक्तीने आमच्याकडे या आम्ही तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनवतो म्हणण्यासारखं आहे.

पहिली यादी जाहीर झाली, तेव्हा महाराष्ट्र संदर्भात महायुती असल्यामुळे आम्ही निर्णय घेतला नाही. जेव्हा यादीत महाराष्ट्राचा नंबर येईल, ते नागपुरातून लढतील. तेव्हा गडकरींचे नाव पहिल्यांदा येईल.

सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर फडणवीस म्हणाले, मावळचा गोळीबार झाला होता, तेव्हाचं सरकार काय होतं, हे ,र्वांना माहिती आहे. सुप्रिया सुळे विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहेत. त्या नेहमी बोलत असतात. हे फार गांभीर्याने घेऊ नये, असे मला वाटतं.

Back to top button