मुंबई : पुढारी वृत्तसेवा : टीआरपी घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना दंडाधिकारी न्यायालयाने मोठा दिलासा दिला. दंडाधिकारी एल.एस.पाढेन यांनी खटला मागे घेण्यासाठी पोलिसांनी केलेला अर्ज मान्य करत अर्णब गोस्वामी यांच्यासह 22 आरोपींविरुद्ध दाखल केलेला एफआयआर मागे घेण्यास परवानगी दिली.
संबंधित बातम्या
वृत्तवाहिन्या चॅनेल टीआरपीमध्ये फेरफार करत आहेत, असा आरोप करून तक्रार दाखल झाल्या नंतर या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल करत सुमारे 15 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.
दरम्यान राज्य सरकारने हा खटला मागे घेण्याचा निर्णय घेतला असून त्याच पार्श्वभूमीवर फौजदारी दंडसंहितेच्या कलम 321 अंतर्गत पोलिसांच्या वतीने गेल्या नोव्हेबर 23 मध्ये विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी खटला मागे घेण्यासाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर दंडाधिकारी एल. एस. पाढेन यांच्यासमोर सुनावणी झाली.