अमित शहांची रात्री उशिरापर्यंत खलबते

अमित शहांची रात्री उशिरापर्यंत खलबते
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या 'सह्याद्री'वरील बैठकीत महायुतीचे काय ठरले, हे एक तर बुधवारीच स्पष्ट होईल किंवा 8 मार्च रोजी नवी दिल्लीतून जाहीर होणार्‍या भाजपच्या लोकसभेच्या दुसर्‍या यादीतच दिसेल.

दोन मार्च रोजी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह 34 केंद्रीय मंत्र्यांचा समावेश असलेली पहिली उमेदवार यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नव्हता. इथे

महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा निर्माण झालेला असून, तो सोडवण्यासाठीच अमित शहा मंगळवारी महाराष्ट्राच्या दोनदिवसीय दौर्‍यावर दाखल झाले. अकोला, जळगाव, जालना इथे त्यांचे कार्यक्रम झाले. छत्रपती संभाजीनगरात त्यांची जाहीर सभा झाली. मराठवाड्यातील जागावाटपाचा अंदाज घेऊन अमित शहा मंगळवारी रात्रीच मुंबईत पोहोचले.

मंगळवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत त्यांची उशिरापर्यंत खलबते सुरू होती.

गेल्यावेळी 2019 मध्ये शिवसेनेने जिंकलेल्या काही जागा भाजपला हव्या आहेत. भाजपने किमान 30 ते 32 जागा मिळाव्यात म्हणून आग्रही भूमिका घेतली आहे. शिवसेनाही गेल्यावेळेस लढलेल्या सर्व म्हणजे 22 जागांसाठी आग्रही आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील गेल्यावेळी शरद पवार यांच्या नेतृत्वात जिंकलेल्या जागांच्या तिप्पट 12 जागांसाठी आग्रह धरला आहे.

महाराष्ट्रात गेल्यावेळी 48 पैकी युतीला 41 जागा मिळाल्या होत्या. या जागा कमी होता कामा नयेत. युतीत ज्या पक्षाची जिंकण्याची शक्यता अधिक आहे आणि ज्यांच्याकडे सक्षम उमेदवार आहेत, हे पाहून जागावाटप करावे, अशा सूचना अमित शहा यांनी 'सह्याद्री'वरील बैठकीत दिल्याचे कळते. काही जागांवर मतभेद आहेत. विशेषत:, ठाणे, गडचिरोली, परभणी, रामटेक या मतदारसंघांत भाजप आणि शिंदे गटात एकमत झालेले नाही. अमित शहा यांनी त्यावर तातडीने तोडगा काढण्याच्या सूचना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

विरोधकांना आणखी काही धक्के?

या बैठकीमध्ये काही संभाव्य पक्ष प्रवेशावरही चर्चा झाल्याचे समजते. काँग्रेसचे काही आमदार आणि महत्त्वाचे नेते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी विरोधकांना धक्के देत हे पक्ष प्रवेश केले जाऊ शकतात. त्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

शहा-शिंदे स्वतंत्र चर्चा

दरम्यान, अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली. त्याचा तपशील मिळू शकला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news