Shiv Sena : शिक्षक भारतीचे जालिंदर सरोदेंचा ठाकरेंच्या सेनेत प्रवेश | पुढारी

Shiv Sena : शिक्षक भारतीचे जालिंदर सरोदेंचा ठाकरेंच्या सेनेत प्रवेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिक्षक आमदार कपिल पाटील यांचे विश्वासू समजले जाणारे शिक्षक भारती संघटनेचे सरचिटणीस जालिंदर सरोदे यांनी आज (दि.५) ठाकरेंच्या शिवसेनेत प्रदेश केला. मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सरोदे यांनी शिवबंधन बांधले.

कपिल पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी नव्या समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापना केली आहे. त्यांचे शिलेदार जालिंदर सरोदे यांनी साथ सोडल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. सरोदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “शिक्षक भावी पिढी तयार करत आहेत, पण भावी पिढी नासलेली चालणार नाही. सध्याच्या राजकारणाला सुसंस्कृतपणाचे धडे देण्याची गरज आहे. राज्यात सुराज्य आणल्याशिवाय शांत बसणार नाही.”

हेही वाचा : 

Back to top button