शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या आमिषाने 45 लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या आमिषाने 45 लाखांची फसवणूक

मिरा रोड ः पुढारी वृत्तसेवा :  मिरा रोड पोलीस ठाणे हद्दीत राहणार्‍या इसमाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून त्यातून चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून 45 लाख 83 हजाराची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या 

मीरारोडच्या पूनम गार्डन भागात अमितकुमार इंद्रमल अग्रवाल हे राहतात. अग्रवाल यांना एका अनोळखी व्यक्तीने फोन करून प्रायव्हेट प्लेसमेंट व्हीआयपी कंपनीचे मॅनेजर बोलत असून आमची कंपनी शेअर मार्केटमध्ये सेबी नोंदणीकृत कंपनी आहे असे सांगितले. आमची कंपनी मार्केट दरापेक्षा 20 टक्के कमी दरात शेअर्स विकते. तुम्ही शेअर्स विकत घ्या, त्यामध्ये तुम्हाला चांगला नफा मिळेल असे सांगून अग्रवाल यांच्या मोबाइलवर कंपनीची लिंक पाठवली. ती लिंक ओपन करून नोंदणी कशी करावी याबाबतची माहिती दिली.

मल्होत्रा याने अग्रवाल यांना गुंतवणुक करण्यासाठी अनेक वेळा फोन करत तुम्ही गुंतवणूक करा तुम्हाला चांगला नफा मिळवून देतो असे सांगितले त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून अग्रवाल यांनीबँक खात्यातून ऑनलाइन 45 लाखांची रक्कम 24 जानेवारी ते 21 फेब्रुवारी 2024 या कालावधीत भरली. ही रक्कम भरल्यानंतर कोणताही संपर्क झाला नाही. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news