जो कायदा मोडेल, त्याला आम्ही सोडणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

जो कायदा मोडेल, त्याला आम्ही सोडणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : सूड भानवेपोटी, आकसापोटी आम्ही कुणाचेही वाईट करणार नाही. पण जो कुणी कायदा मोडेल, त्याला आम्ही सोडणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केले. एकनाथ शिंदे म्हणाले, चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. विरोधकांचे चित्रपट फ्लॉप होत चालले आहेत. विरोधकांची स्क्रिप्ट एकच असते. दीड वर्षात अनेक कल्याणकारी योजना आणल्या. पक्ष चोरला, चिन्ह चोरला असा थटथयाट सुरु आहे. एकच स्क्रिप्ट वाचून काय होत नाही. स्वार्थासाठी विचार विकलेल्यांचा कांगावा सुरु आहे, असा टोला शिंदेनी ठाकरेंचं नाव न घेता लगावला.

शिंदे म्हणाले, जनतेसाठी अनेक योजना करण्यावर सरकारचा भर आहे. हे चोरलं ते चोरलं सारखं कशाला म्हणायचं? मोदींनी अनेक योजना आणल्या. उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या खात्यातून ५० कोटी घेतले. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मर्दासारखं बोला, जाहिरपणे बोला, अशीही टीका त्यांनी विरोधकांवर केली.

कोस्टल रोड पालघरपर्यंत नेणार आहे. विरोधकांनी राज्याचा भ्रमनिरास केला. सत्य मांडायचं सोडून आणि जे चांगलं आहे ते सोडून विरोधकांनी फक्त टीका केली. सरकार कुठे कमी पडतयं , हे सांगावं. विरोधक जे वाईट आहेत, तेच उचलतात. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, अशोक चव्हाण देखील आमच्यासोबत आले. मोदी गॅरंटीवर विश्वास आहे. मोदींवर विश्वास असल्याने अजित पवारदेखील आमच्यासोबत आले. मोदींच काम बघून लोक सरकारमध्ये येत आहेत. आम्ही कोणाला बोलवत नाही, पण नेते येतात.

विधीमंडळाचं कामकाज फेसबूकवर करता येत नाही. सकाळी सोबत असलेला नेता सोबत राहिल का? शेतकऱ्यांना वाऱ्यावर कधी सोडणार नाही. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. फक्त मदतीच्या घोषणा नाही तर प्रत्यक्षात मदत करतो. विरोधक आता कुठे गेले? गेल्या सरकारनं फक्त पोकळ आश्वासने दिली. शेतकऱी नव्हे तर विरोधक कोमात गेले आहेत. पोकळ घोषणा तुमच्या, भरीव काम आमचं. वर्क फ्रॉम वाल्यांकडून काय अपेक्षा करणार? अडीच वर्षात विरोधकांनी काय केलं? निधीतला ८५ टक्के पैसा कुठे जायचा. तुम्ही शेतकऱ्यांना काय दिलं? असाही प्रश्न शिंदेंनी उपस्थित केला.

दिव्यांग व्यक्तींना स्वत:चं घर मिळणार. मराठवाडा वॉटरग्रीडला देखील चालाना देतोय. कोकणाला समृद्ध करण्याचं काम सुरु आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर ३५ हजार कोटी जमा झाले. आधीच्या सरकारने ३० हजार कोटी हडपले.

Back to top button