Leap year : आता आमचा वाढदिवस चार वर्षांनी होणार साजरा | पुढारी

Leap year : आता आमचा वाढदिवस चार वर्षांनी होणार साजरा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील पालिका आणि सरकारी रुग्णालयांत गुरुवार, दि. 29 रोजी 33 बालकांचा जन्म झाला आहे. या सर्व बालकांचा वाढदिवस हा चार वर्षानंतर एकदा येणार आहे. लिप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा असतो. लिप वर्ष चार वर्षातून एकदा येत असल्याने यादिवशी जन्म घेणार्‍या बालकांचा वाढदिवस हा चार वर्षानंतर एकदा येतो. (  Leap year )

संबंधित बातम्या

केईएम रुग्णालयात दोन मुलांचा जन्म झाला असून त्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे. सायन रुग्णालयात 14 बालकांचा जन्म 8 मुले आणि 6 मुलांचा जन्म झाला आहे. कामा रुग्णालयात दोन मुलांचा जन्म झाला आहे. कुपर रूग्णालयात पाच मुलांचा जन्म झाला तर नायर रुग्णालयात सहा यामध्ये तीन मुले आणि तीन मुली आहेत आणि जे जे रूग्णालयात चार मुलांचा जन्म झाला आहे.

यंदाचे 2020 हे लीप वर्ष आहे. वर्षातील फेब्रुवारी महिन्याव्यतिरिक्त अन्य महिने 30 किंवा 31 दिवसांचे असतात. फेब्रूवारी महिना 28 दिवसांचा असतो, परंतु लीप वर्ष आले असता एक दिवस वाढून तो 29 दिवसाचा होतो. या दोन दिवशी ज्यांचा जन्म असतो ते त्यांचा आनद व्दिगुणीत करणारा ‘लीप डे ’ म्हणूनही साजरा करतात.

या दिवशी जन्मलेल्यांचा वाढदिवस पळवाट म्हणून आदल्या किंवा दुसर्‍या दिवशी अनेक जण साजरा करतात. लिप इयरमध्ये जन्म घेणार्‍या मुलांना ‘लिपलिंग्ज’ किंवा ‘लिपर्स’ म्हटले जाते. ( Leap year )

Back to top button