Avtar Saini Death News : इंटेल इंडिया'चे माजी प्रमुख अवतार सैनी यांचा अपघातात मृत्यू; सायकलवरुन जाताना टॅक्सीची जोरदार धडक | पुढारी

Avtar Saini Death News : इंटेल इंडिया'चे माजी प्रमुख अवतार सैनी यांचा अपघातात मृत्यू; सायकलवरुन जाताना टॅक्सीची जोरदार धडक

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंटेल कंपनीचे भारतातील माजी प्रमुख अवतार सैनी यांचे अपघातात निधन झाले आहे. नवी मुंबईमध्ये सायकलवरुन जात असताना एका टॅक्सीने त्यांना धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अवतार यांनी इंटेलच्या पेंटियम प्रोसेसरचं डिझाईन केलेलं होतं. (Avtar Saini Death News)

अवतार सैनी हे बुधवारी (दि. २८) पहाटे सहाच्या सुमारास ते नेरुळ भागात सायकलिंग करण्यासाठी गेलेले होते. ते ६८ वर्षांचे होते. यावेळी एका भरधाव टॅक्सीने त्यांच्या सायकलला मागून जोराची धडक दिली. या धडकेनंतर आरोपी टॅक्सी चालकाने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी सायकल टॅक्सीमध्ये अडकल्यामुळे सैनीदेखील टॅक्सीसोबत काही अंतर फरपटत गेले. सैनी यांच्या निधनामुळं उद्योगवर्तुळात शोक व्यक्त होत आहे. सैनी यांच्या मागे एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. सैनी यांच्या मागे एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. (Avtar Saini Death News)

या प्रकरणी आरोपी कॅब ड्रायव्हर हृषिकेश खाडे याच्यावर निष्काळजीपणे ड्रायव्हिंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. मात्र चौकशीत सहकार्य करण्याची व आरोपपत्र दाखल झाल्यावर न्यायालयात हजर राहण्याची नोटीस त्याला बजावण्यात आली आहे. सैनी यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली.

हेही वाचा

Back to top button