फडणवीसांना धमकी देणारी पोस्ट शेअर केल्याप्रकरणी एकाला अटक

Maharashtra Politics
Maharashtra Politics

 पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अपमानास्पद भाषा वापरुन जीवे मारण्याची धमकीची पोस्ट शेअर केल्याप्रकरणी  मुंबई पोलिसांनी एकाला अटक केली आहे. योगेश सावंत असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असुन तो शऱद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया सेल कार्यकर्ता आहे. त्याच्यावर मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहिता अंतर्गत कलम  153(A), 500, 505(3), 506(2), आणि 34 अन्वये गुन्‍हा नोंदवला असल्‍याचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. (Maharashtra Politics)

मुस्कटदाबीचा आम्ही निषेध करतो

दरम्यान महाविकास आघाडीच्या अधिकृत 'X' खात्यावर शेअर केलेल्य़ा पोस्टमध्ये म्हटलं आहे की, " एका ट्यूब चॅनलने व्हिडीओद्वारे मराठा आंदोलक तरुणाची घेतलेली प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सोशल मीडियाचे योगेश सावंत यांनी सोशल मिडियावर शेअर केली, जे कुठल्याही प्रकारचे गुन्हेगारी कृत्य ठरत नाही. योगेशला अटक करून सरकारने चालवलेल्या मुस्कटदाबीचा आम्ही निषेध करतो. योगेश, आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे की, "घाबरलेल्या राज्य सरकारचा तीव्र निषेध ! तुमच्या हुकूमशाहीला आम्ही विरोध करत राहणार लढेंगे और जितेंगे…

Maharashtra Politics :  मुख्यमंत्री शिंदेंच्या खोट्या स्वाक्षऱ्या आणि..

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी आणि शिक्के वापरल्याबद्दल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून मरिन ड्राइव्ह पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसी ४२०, ४६५,४६८,४७१ आणि ४७३ नुसार गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.अधिकार्‍यांच्या बदल्यांपासून व्यक्तिगत मदतीसाठीच्या निवेदनांवर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांची सुमारे बारा निवेदने समोर आली आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news