Budget 2024 : पेपरफुटी प्रकरणावरून विरोधक आक्रमक; श्वेत पत्रिका काढण्याची मागणी | पुढारी

Budget 2024 : पेपरफुटी प्रकरणावरून विरोधक आक्रमक; श्वेत पत्रिका काढण्याची मागणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज (दि.२९) चौथा दिवस आहे. स्पर्धा परिक्षांच्या पेपरफुटी प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले. राज्यातील परीक्षा घोटाळ्यावर श्वेत पत्रिका काढावी, अशी मागणी करत विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.

राज्यातील परीक्षा घोटाळ्यावर श्वेत पत्रिका काढावी, सर्व परिक्षा एमपीएससी (MPSC) मार्फत घ्याव्यात. राज्यात सतत होणाऱ्या पेपरफुटीने विद्यार्थी त्रस्त असून सरकार मात्र फोडाफोडीचे राजकारण करण्यात व्यस्त आहे. तलाठी भरती परीक्षेची एसआयटी चौकशी व्हावी, यासह अन्य मागण्यांचे फलक घेऊन विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. पेपरफुटीमुळे गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होते. महाराष्ट्रात पेपरफुटीचं रॅकेट सक्रीय आहे. राज्यातील परिक्षा घोटाळ्याबाबत श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button