Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा १० मार्चला महाराष्ट्रात | पुढारी

Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा १० मार्चला महाराष्ट्रात

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा १० मार्चला महाराष्ट्रात दाखल होणार आहे. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातून प्रवेश करून १३ किंवा १४ तारखेला मुंबईत यात्रेचा समारोप होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यात्रेच्या समारोपाची मोठी सभा मुंबईत होणार आहे. सभेच्या नियोजनासाठी प्रदेश काँग्रेसला आवश्यक सूचना पक्षनेतृत्वाने दिल्याचे समजते. या सभेतून काँग्रेस लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. Bharat Jodo Nyay Yatra

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा विश्रांतीनंतर २ मार्चला पुन्हा सुरू होणार आहे. राजस्थानच्या ढोलपूरमधून ही यात्रा सुरू होणार आहे. पुढे मध्यप्रदेशात ही यात्रा ४ दिवस असणार आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गुणा मतदारसंघातूनही ही यात्रा जाणार आहे. ७ तारखेला यात्रा पुन्हा राजस्थानमध्ये प्रवेश करेल. राजस्थानमच्या बासवारा येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले आहे. बासवारानंतर यात्रा गुजरातमध्ये प्रवेश करेल आणि जवळपास तीन दिवसांनी महाराष्ट्रात प्रवेश करेल. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातुन यात्रा १० तारखेला प्रवास करेल. यानंतर पुन्हा एक दोन दिवस विश्रांतीनंतर यात्रा मुंबईच्या दिशेने प्रवास करेल. काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश यांनी आज पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. आणि याबाबत माहिती दिली. Bharat Jodo Nyay Yatra

१३ किंवा १४ मार्चला भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईत समारोप होणार आहे. महाराष्ट्रातून यात्रेचा मार्ग अद्याप स्पष्ट झाला नसला तरी धुळे, नाशिक, नंदुरबार, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर या जिल्ह्यातून जवळपास ४८० किलोमीटरचा प्रवास करण्याची शक्यता आहे. यादरम्यान दोन सभाही होणार आहेत. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यात्रेच्या समारोपाची मोठी सभा मुंबईत होणार आहे. सभेच्या नियोजनासाठी प्रदेश काँग्रेसला आवश्यक सूचना पक्षनेतृत्वाने दिल्याचे समजते. या सभेतून काँग्रेस लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. या सभेच्या समारोपीय सभेत इंडिया आघाडीचा मोठा मेळावा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अपेक्षित कालावधीपूर्वी यात्रेचा समारोप होत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागण्यापूर्वी भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होऊ शकतो.

हेही वाचा   

Back to top button