मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे मंगळवारी सभागृहामध्ये उपस्थित होते. विधान परिषद सभागृहातून बाहेर येताना लिफ्टजवळ ठाकरे, भाजप आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर समोरासमोर आले. यावेळी ठाकरे यांच्यासाठी संपूर्ण लिफ्ट खाली करू, असे लाड म्हणाले. त्यावर आमचा अख्खा पक्षच तुम्ही खाली केला, असा खोचक टोला ठाकरे यांनी लगावला. त्यांच्या या टोल्याने उपस्थितांत एकच हशा पिकला.