Black Panther : आंबोली परिसरात ‘ब्लॅक पँथर’चे दर्शन

Black Panther
Black Panther

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : आंबोली, कोकण परिसरात काळ्या बिबट्याचे म्हणजेच 'ब्लॅक पँथर'Black Panther चे पुन्हा एकदा दर्शन झाले आहे. यावेळी हा प्राणी कॅमेर्‍यात कैद झाला आहे. मुंबईतील रुपारेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आंबोलीतील शैक्षणिक सहलीदरम्यान या प्राण्याचे दर्शन झाले असल्याचेही सांगण्यात आले आहे.

काही पर्यटकांनी धाडस करून या बिबट्याचे फोटो काढले. फोटो दुरून काढल्याने ते काहीसे अस्पष्ट आले आले असले तरी या भागात या काळ्या बिबट्याचा वावर असल्याचे अधोरेखित झाले आहे. जैवविविधतेने समृद्ध असणार्‍या या प्रदेशात ब्लॅक पँथरचे Black Panther अस्तित्व असण्यावर यापूर्वी देखील शिक्कामोर्तब झाले आहे. 2014 साली आजर्‍यामध्ये काळ्या बिबट्याची नोंद झाली होती. 2016 मध्ये तिलारीमधूनही काळ्या बिबट्याची नोंद करण्यात आली आहे. गेल्या ऑगस्टमध्येही आंबोलीत काळ्या बिबट्याचे दर्शन झाले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news