काँग्रेसचे नाराज आमदार ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत | पुढारी

काँग्रेसचे नाराज आमदार ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत

मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काँग्रेसचे नाराज 15 आमदार लोकसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हे आमदार भाजप आणि अजित पवार गटात प्रवेश करतील, अशी भाजपची रणनीती आहे.

चव्हाण यांचे काँग्रेसमध्ये 15 हून अधिक समर्थक आमदार आहेत. मात्र, लगेच आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश करणे या आमदारांच्या राजकीय फायद्याचे नाही.

भाजपकडे सर्व तपशील उपलब्ध

कोणते आमदार भाजपमध्ये येणार, याची सर्व माहिती भाजपच्या धुरिणांकडे आहे. काँग्रेसच्या दोन आमदारांना भाजपने लोकसभेची उमेदवारी देण्याची हमी दिली होती. त्यांनी त्यास नकार दिला आहे.

Back to top button