26/11 Mumbai Attack : शहीद बाळासाहेब भोसले यांच्या कुटुंबियांनी वाहिली श्रद्धांजली

पनवेल, पुढारी वृत्तसेवा : 26 नोव्हेंबर 2008 हा दिवस मुंबईसह संपूर्ण देशासाठी काळा दिवस ठरला. याच दिवशी मुंबईवर दहशतवाद्यांनी (26/11 Mumbai Attack) भ्याड हल्ला झाला केला. जवळपास 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील महत्वाच्या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार करत शेकडो नागरिकांचे जीव घेतले. हा भ्याड दहशतवादी हल्ला परतवून लावण्यासाठी दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी मुंबई पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावली. यामध्ये अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी दहशतवाद्यांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडले होते. त्यामध्ये पनवेल शहरातील तक्का गावात राहणाऱ्या शहीद बाळासाहेब भोसले यांचा समावेश आहे. आज भोसले यांच्या कुटूंबाकडून श्रद्धांजली वाहण्यात आली.
बाळासाहेब भोसले घरातील कर्ता पुरुष होते. या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले. जेव्हा दहशतवादी कामा हॉस्पिटल बाहेर गोळीबार करत असल्याची माहिती मिळाली, त्यावेळी एटीएस चीफ हेमंत करकरे एसीपी अशोक कामटे आणि एन्काऊंटर स्पेशलिस्ट विजय साळस्कर हे ज्या गाडीतून काम हॉस्पिटलला निघाले. त्यावेळी त्या गाडीत बाळासाहेब भोसले देखील होते.
यावेळी कामा हॉस्पिटल बाहेर झाडीत दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी पोलिसांच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार केला. यात हेमंत करकरे, अशोक कामटे व विजय साळस्कर शहीद झाले. यावेळीच गाडीत असणाऱ्या बाळासाहेब भोसले यांना देखील 9 ते 10 गोळ्या लागल्या होत्या.
ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. आज या घटनेला 13 वर्ष पूर्ण होत आहेत. तरी देखील त्या घटनेच्या सर्व जखमा आजही ताज्या आहेत. भोसले कुटुंबीय आजही शहीद बाळासाहेब भोसले यांच्या शौर्याला सलाम करतात. आज 26/11 Mumbai Attack निमित्ताने शहीद बाळासाहेब भोसले यांना सर्व कुटुंबियांनी पाणावलेल्या डोळ्यांनी श्रद्धांजली देत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
हे वाचलंत का?
- Delhi High Court : “केंद्राने बुस्टर डोससंदर्भात भूमिका स्पष्ट करावी”
- जीएसटीतील बदलाने कपडे, चप्पल महागणार
- #INDvNZ : कसोटी पदार्पणात श्रेयस अय्यरचं शतक