Bandra Reclamation project | ‘अदानी रियल्टी’ची वांद्रेतील मोक्याच्या २४ एकर जागेसाठी सर्वाधिक बोली | पुढारी

Bandra Reclamation project | 'अदानी रियल्टी'ची वांद्रेतील मोक्याच्या २४ एकर जागेसाठी सर्वाधिक बोली

पुढारी ऑनलाईन : अदानी रियल्टीने लार्सन अँड टुब्रोला मागे टाकून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) वांद्रे येथील पुनर्विकासाच्या (Bandra Reclamation project) २४ एकर मोक्याच्या जागेसाठी सर्वाधिक बोली लावली आहे. एमएसआरडीसीने वांद्रे रेक्लमेशन येथील मोक्याच्या ठिकाणच्या जागेवर इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

संयुक्त भागिदारी प्रकल्पाअंतर्गत या जागेचा विकास केला जात आहे. त्यासाठी एमएसआरडीसीने माहीम खाडीकडे आणि कास्टिंग यार्ड आणि एमएसआरडीसी कार्यालय असलेल्या सी लिंक अप्रोच रोडच्या बाजूने असलेल्या मोक्याच्या जागेसाठी निविदा मागविल्या होत्या. हा भूखंड व्यावसायिक तसेच निवासी वापरासाठी वाटप करण्यात आला आहे आणि त्याची किंमत सुमारे ३० हजार कोटी रुपये आहे.

या जागेचे संभाव्य विकास क्षेत्र ४५ लाख चौरस फूट आहे. वांद्रे रेक्लमेशनमधील निवासी किंमत सुमारे ८३ हजार प्रति चौरस फूट अशी आहे.

बोलीच्या अटींनुसार, अदानी रियल्टीला MSRDC सोबत या प्रकल्पातून मिळालेल्या एकूण उत्पन्नातील ८ हजार कोटी रुपये अथवा २३.१५ टक्के एकूण महसूल वाटून घ्यावा लागेल.

“अदानी रियल्टीने सुमारे ४ टक्के अधिक बोली लावून प्रतिस्पर्धी फर्म L&T रियल्टीला मागे टाकले,”असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तिसरा प्रतिस्पर्धी मेफेअर हाऊसिंगची बोली अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकली नाही, असेही सांगण्यात आले आहे. (Bandra Reclamation project)

हे ही वाचा :

 

Back to top button