MHT CET 2024 : सीईटी अर्ज करण्यास मुदतवाढ | पुढारी

MHT CET 2024 : सीईटी अर्ज करण्यास मुदतवाढ

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी घेण्यात येत असलेल्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा नोंदणी करण्यासाठी काही अभ्यासक्रमांकरीता पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुदत वाढ दिलेल्या अभ्यासक्रमात एमएचटी सीईटीसाठी १ मार्चपर्यंत मुदत असणार आहे. आणि बीएबीएस्सी बीएड या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येत असलेल्या अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च असणार आहे. यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे परीक्षा कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सदरील परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज कसा भरायचा, नोंदणी वेळापत्रक माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळवर https://www.maha- cet.org उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दरम्यान, एमएचटी सीईटीला ३ लाख ५७ हजार ६८९ अर्ज आले आहेत. गतवर्षी ६ लाख ३६ हजार अर्ज आले होते.

Back to top button