प्राथमिक शाळा सकाळी ९ नंतर भरवण्याच्या निर्णयाला स्कूल बस ओनर्स असोसिएशनचा विरोध | पुढारी

प्राथमिक शाळा सकाळी ९ नंतर भरवण्याच्या निर्णयाला स्कूल बस ओनर्स असोसिएशनचा विरोध

मुंबई : पुढारी वृत्तसेवा – प्राथमिक शाळा सकाळी नऊ नंतर भरविण्याचा निर्णय़ घेताना राज्य सरकार आणि शिक्षण विभागाने स्कूल बस मालकांशी चर्चा केली नाही. तसेच सकाळच्या वाहतूक कोंडीत स्कूल बस चालवणे अवघड असल्याचे सांगत राज्य सरकारच्या या निर्णयाला स्कूल बस ओनर्स असोसिएशनने विरोध केला आहे. तसेच या निर्णयाविरोधात स्कूल बसचे भाडे २५ ते ४० टक्यांनी वाढविण्याचा इशारा दिला आहे.

संबंधित बातम्या –

राज्य सरकारने नवीन जीआर काढला आहे. नवीन जीआरनुसार प्राथमिक शाळा सकाळी ९ नंतर सुरु होणार आहेत. सरकार हा निर्णय कसा आणि कोणत्या आधारावर घेऊ शकतात, असा सवाल स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी केला आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी सरकारने शाळा व्यवस्थापन, पालक, स्कूल बस कंत्राटदार यांच्याशी चर्चा करणे अपेक्षित आहे.

मुंबई, ठाणे, पुणे सारख्या शहरांमध्ये सकाळच्या सुमारास कार्यालयीन वेळेत रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी असताना बस चालवणे शक्य नसल्याचे बस मालकांचे म्हणणे आहे. दोन सत्रात शाळांना स्कूल बसचे व्यवस्थापन कसे शक्य आहे. दिवसातून चार वेळा मुलांना शाळेत आणणे, घरी सोडणे कठीण आहे. सरकारला रस्त्यांची परिस्थिती माहिती नाही का? सकाळच्या वाहतूक कोंडीत त्यामुळे आणखी भर पडेल, असेही अनिल गर्ग यांनी सांगितले.

निर्णयाची सक्ती करण्यात आली तर बसचे भाडे २५ ते ४० टक्यांनी वाढविण्यात येईल. त्याआधी राज्य सरकारने याप्रकरणी बैठक घेउन तातडीने मार्ग काढावा. – अनिल गर्ग, अध्यक्ष, स्कूल बस ओनर्स असोसिएशन

Back to top button