

मुंबई : भाजपने द्रौपदी मुर्मू यांच्यापूर्वी मला राष्ट्रपतिपदाची विचारणा केली होती. पण, मी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत असणार्या वैचारिक मतभेदांमुळे त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. (Prakash Ambedkar)
एका वृत्तवाहिनीशी बोलताना आंबेडकर म्हणाले, की भाजपने मला विचारलं, तुम्हाला राष्ट्रपती व्हायला आवडेल का? त्यावर तुम्ही मला राजकारणातून बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहात का? असा उलटसवाल करत त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला. मी तुमच्या विरोधात आहे हे लक्षात घ्या, असे भाजप नेत्यांना सांगितल्याचा दावा आंबेडकरांनी केला.
मनोज जरांगे यांना लोकसभेची निवडणूक लढवण्याचे आवाहन यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. जरांगे यांनी कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना येथून लोकसभेची निवडणूक लढवावी. आरक्षणाचा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून लढण्यात काहीही अर्थ नाही, असे आंबेडकर म्हणाले.