"मुंबई काँग्रेसचे अध्‍यक्ष..." भाजप प्रवेशावेळी अशोक चव्‍हाणांची 'स्लिप ऑफ टंग'! | पुढारी

"मुंबई काँग्रेसचे अध्‍यक्ष..." भाजप प्रवेशावेळी अशोक चव्‍हाणांची 'स्लिप ऑफ टंग'!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते आणि माजी मुख्‍यमंत्री अशोक चव्‍हाण (Ashok Chavan) यांनी आज (दि.१२) भाजपमध्‍ये पक्षप्रवेश केला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत मात्र भाजपवासी झालेल्‍या अशोक चव्‍हाणांना पुन्‍हा काँग्रेसचे स्‍मरण झाले. मात्र तब्‍बल पाच दशक काँग्रेसमध्‍ये राहिलेल्‍या अशोक चव्‍हाणांचे भाजपमध्‍ये पुन्‍हा काँग्रेसचेच स्‍मरण झाल्‍याने पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.

आज उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्‍यक्ष अशिष शेलार यांच्‍या उपस्‍थितीत अशोक चव्‍हाण यांनी भाजपमध्‍ये प्रवेश केला. फडणवीस यांनी त्‍यांचे पक्षात स्‍वागत केले. अशोक चव्‍हाण यांच्‍यासारखे ज्‍येष्‍ठ नेते भाजपमध्‍ये दाखल झाले असून, त्‍याच्‍याबरोबर हजारो कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेशचाही आम्‍ही एक कार्यक्रम आयोजित करु, असे त्‍यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला प्रगतीपथावर घेवून जात आहेत. अशोक चव्‍हाण यांनी या विकासपर्वात सहभागी होण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली होती. आम्‍ही त्‍यांचे भाजपमध्‍ये स्‍वागत केले, असेही फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. ( Ashok Chavan’s ‘slip of tongue’ during BJP joining )

अशोक चव्‍हाणांची चव्‍हाणांची ‘स्लिप ऑफ टंग’?, काँग्रेसचे स्‍मरण..

यावेळी पत्रकार परिषदेत बोलण्‍यास सुरुवात करताना अशोक चव्‍हाण यांनी उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍या नावाचा उल्‍लेख केला. यानंतर त्‍यांनी “मुंबई काँग्रेसचे अध्‍यक्ष…” असे म्‍हणताच उपस्‍थित अवाक झाले तसेच एकच हशा पिकला. अशोक चव्‍हाणांनी आपली चूक तत्‍काळ लक्षात आली. त्‍यांनी तत्‍काळ  खुलासा केला की, मी कालच काँग्रेसच्‍या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. आज भाजपमध्‍ये प्रवेश करत आहे. गेली अनेक वर्ष माझ्‍या बोलणे अंगवळणी पडलेले असते. त्‍यामुळे मी “मुंबई काँग्रेसचे अध्‍यक्ष…” असे उच्‍चारले. मी चूक सुधारतो मुंबई भाजपचे अध्‍यक्ष अशिष शेलार असे म्‍हणत अशाेक चव्‍हाण  स्‍वत: ही हशामध्‍ये सहभागी झाले.


हेही वाचा : 

Back to top button