मुंबईचे डझनभर नगरसेवक सोडणार ‘हात’! | पुढारी

मुंबईचे डझनभर नगरसेवक सोडणार ‘हात’!

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत केलेल्या प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये मोठी गळती सुरू झाली आहे. मुंबईतील तब्बल डझनभर नगरसेवक काँग्रेसचा हात सोडणार आहेत. सोमवारी दोन नगरसेवकांनी भाजपचे कमळ हाती घेतले. आणखी अनेक नगरसेवकांचा प्रवेश लवकरच भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन माजी नगरसेवक वगळता अन्य सात माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेसह अजित पवारांच्या गटात प्रवेश केला आहे. सोमवारी काँग्रेसचे जगदीश कुट्टी अमिन व राजेंद्र नरवणकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

Back to top button