Latest
मुंबईकरांना दिलासा; मालमत्ता करात कोणतीही वाढ नाही; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईकरांना यंदाही मालमत्ता करातून मोठा दिलासा मिळाला आहे. मालमत्ता करात वाढ न करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय :
- मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढ नाही
- राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित करणार. २ लाख रोजगार, स्वयंरोजगार निर्माण करणार
- ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील. मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून ६५ वर्षावरील नागरिकांना लाभ देणार
- राज्यातील सर्व पालिकांमध्ये आता नगरोत्थान महाभियान राबवणार. पायाभूत सुविधा बळकट करणार
- उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देणार
- मधाचे गाव योजना संपूर्ण राज्यात राबवणार. मध उद्योगाला बळकटी
- पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात बिबट सफारी
- बंजारा, लमाण समाजाच्या तांड्यांचा विकास करणार. मूलभूत सुविधा देणार
- शिर्डी विमानतळाचा अधिक विस्तार, नवीन इमारत उभारणी
- धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागणार
- सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते
- स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन सांगोला प्रकल्पास सुधारित मान्यता
- बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य. पतसंस्थांना मजबूत करणार
- कोंढाणे लघु प्रकलपाच्या कामास जादा खर्चास मान्यता
- तिवसे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना करणार
- नांदेडच्या गुरुद्धारासाठी तख्त सचखंड श्री हजूद सादिब गुरुद्धारा अधिनियम
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमणार
- कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय आता साठ वर्ष
- सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकामचे नवीन मंडळ कार्यालय
- गोसेवा आयोगासाठी सहआयुक्त पशुसंवर्धन पद
हेही वाचा :

