Mahesh Gaikwad Health: महेश गायकवाड यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण; प्रकृती चिंताजनक | पुढारी

Mahesh Gaikwad Health: महेश गायकवाड यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण; प्रकृती चिंताजनक

ठाणे; पुढारी वृत्तसेवा: भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबारात गंभीर जखमी झालेले कल्याणचे शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र अद्याप प्रकृती चिंताजनकच आहे. त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. (Mahesh Gaikwad Health)

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ज्यूपिटर हॉस्पिटलला भेट देऊन गायकवाड यांच्या प्रकृतीची डॉक्टरांकडून माहिती घेतली. महेश गायकवाड यांच्याशी प्रत्यक्ष बोलता आले नाही. मात्र त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांकडून माहित घेतल्याचे देसाई यांनी सांगितले. दुसरीकडे पोलीस त्यांचे काम करतील, कोणताही मंत्री तपासात हस्तक्षेप करणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही देसाई यांनी दिली. (Mahesh Gaikwad Health)

ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोळीबाराचे फुटेज बाहेर आलेच कसे, असा सवाल उपस्थित केला आहे. त्यावर बोलताना शंभूराज देसाई यांनी, मला याबाबत काही माहिती नाही. माहिती घेतल्यानंतरच बोलेन, असे सांगत अधिक बोलणे टाळले. (Mahesh Gaikwad Health)

हेही वाचा:

Back to top button