Railway recruitment : रेल्वे भरतीचे वेळापत्रक जाहीर; वर्षातून चार परीक्षा घेतल्या जाणार | पुढारी

Railway recruitment : रेल्वे भरतीचे वेळापत्रक जाहीर; वर्षातून चार परीक्षा घेतल्या जाणार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : एमपीएससी आणि यूपीएससीप्रमाणे भारतीय रेल्वेने वार्षिक भरती कॅलेंडर जाहीर करावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. त्यानुसार रेल्वे भरती मंडळाने यावर्षीच्या रेल्वे भरती परीक्षांचे वार्षिक कॅलेंडर जाहीर केले आहे. या कॅलेंडरमध्ये वर्षभरात घेण्यात येणार्‍या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. वर्षातून चार परीक्षा घेण्यात येणार आहेत. या कॅलेंडरमुळे रेल्वेची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी भरतीसंदर्भात घोषणा केली. टेक्निशियन भरती एप्रिलमध्ये, एनटीपीसी भरती जूनमध्ये आणि लेव्हल-1 भरती ऑक्टोबरमध्ये होणार आहे. एप्रिलमध्ये निवडणुकीची आचारसंहिता शक्यता असल्याने यंदा तंत्रज्ञांची भरती फेब्रुवारीत घेतली जाणार आहे.

रेल्वे भरती कॅलेंडर 2024

असिस्टंट लोको पायलटची भरती : जानेवारी-मार्च
तंत्रज्ञ पदांसाठी भरती : एप्रिल ते जून या कालावधीत
नॉन-टेक्निकल लोकप्रिय श्रेणी एनटीपीसी पदवी स्तर 4, 5, 6 आणि कनिष्ठ अभियंता आणि पॅरामेडिकल श्रेणी भरती : जुलै-सप्टेंबर
रेल्वे श्रेणी -1 (ग्रुप डी भरती) आणि मंत्री आणि पृथक श्रेणी भरती : ऑक्टोबर-डिसेंबर

Back to top button