By Election : ‘या’ महानगरपालिकांतील रिक्तपदांसाठी पोटनिवडणूक जाहीर | पुढारी

By Election : ‘या’ महानगरपालिकांतील रिक्तपदांसाठी पोटनिवडणूक जाहीर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : By Election : धुळे, अहमदनगर, नांदेड- वाघाळा आणि सांगली-मिरज-कुपवाड या चार महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान तर २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.

मदान म्हणाले, या पोटनिवडणुकांसाठी संबंधित प्रभागात आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. नामनिर्देशनपत्रे २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत स्वीकारले जातील. ५ डिसेंबर रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. ७ डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत ९ डिसेंबरपर्यंत असेल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना १० डिसेंबर रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. २१ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी २२ डिसेंबर रोजी होईल.

महानगरपालिकानिहाय रिक्तपदे

धुळे- ५ ब, अहमदनगर- ९ क, नांदेड वाघाळा- १३ अ आणि सांगली मिरज कुपवाड- १६ अ.

Back to top button