किशोरी पेडणेकर, संदीप राऊत यांची आज पुन्हा ईडी चौकशी | पुढारी

किशोरी पेडणेकर, संदीप राऊत यांची आज पुन्हा ईडी चौकशी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर कोविड घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत हे देखील बीएमसी खिचडी कोविड घोटाळा प्रकरणाच्या संदर्भात चौकशीसाठी मुंबईतील ईडी कार्यालयात पोहोचले आहेत.

ईडी कार्यालयात जाण्याआधी संदीप राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सरकारवर आरोप केला. “हा राजकीय हेतूने प्रेरित मुद्दा आहे. संजय राऊत भाजप विरोधात बोलत आहेत, त्यांना खाली खेचण्यासाठी हे केले जात आहे. राऊत कुटुंबावर दबाव आणण्यासाठी हे केले जात आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button