

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण प्रश्नावरून मनोज जरांगे-पाटील यांचा मुंबईच्या दिशेने पायी दिंडी सुरू आहे. जरांगे पाटील यांची पायी दिंडी सध्या पुण्यात असून, ती मुंबईकडे कूच करत आहे. दरम्यान, मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्यास जरांगे पाटील यांना पोलिसांकडून मनाई करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांना खारघर येथील जागेचा दिला पर्याय दिला आहे. या संदर्भात जरांगे पाटील यांना नोटीस देखील पाठवण्यात आली आहे. (Maratha Reservation)
आझाद मैदान पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन तडाखे यांनी मराठा क्रांती मोर्चा महा मुंबई समन्वयक वीरेंद्र पवार व प्रशांत सावंत यांना सीआरपीसी १४९ अंतर्गत नोटीस बजावली आहे. या नोटीसवरून हायकोर्टात दाद मागणार असल्याचे मनोज जरांगे-पाटील यांचे कार्यकर्ते वीरेंद्र पवार यांनी स्पष्ट केले आहे. (Maratha Reservation)
काल पुण्याहून रवाना झालेला मराठा मोर्चा आज (दि.२५) सकाळी लोणावळ्यात दाखल झाले . येत्या २४ तासात हे भगवं वादळ मुंबईमध्ये जाऊन धडकणार आहे. बीडपासून निघालेल्या आंदोलनात ठिकठिकाणाहून मराठा समाजबांधव सामील झाले आहेत. लोणावळ्यातही जरांगे-पाटलांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी बोलताना जरांगे म्हणतात, ' २६ तारखेला मराठा समाज मुंबईकड येणार. मी आधीच सांगितलं होतं, मुंबईच्या गल्ली गल्लीत मराठा समाज असणार आहे. आम्हाला फक्त आरक्षण मिळालं पाहिजे ते कुठंही दिलं तरी चालेल. मग लोणावळ्यात, नवी मुंबईत किंवा आझाद मैदानात दिलं तरी चालेल, असंही यावेळी मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. या दरम्यान त्यांनी मराठा आंदोलकांना काही सूचनाही केल्या.
हेही वाचा: