MLA Disqualification Case : अपात्रतेचं काऊंटडाऊन सुरू,४८ तासात राजकीय भूकंप?

File Photo
File Photo
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवरील निकालासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत बुधवारी संपत आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पुढील दोन दिवसांत आपला निकाल द्यावा लागणार आहे. एकीकडे या निकालाबाबत उत्सुकता ताणली गेलेली असताना नार्वेकर यांनी रविवारी थेट वर्षा बंगला गाठत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. अपात्रतेचं काऊंटडाऊन सुरू झाले असून ४८ तासात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

अचानक ठरलेल्या या भेटीमुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. नार्वेकर आणि शिंदे यांच्यात सुमारे ४० मिनिटे चर्चा झाल्याचे समजते. यावेळी अन्य कोणताही नेता, अधिकारी नव्हता. या अचानक भेटीचा संबंध निकालाशी जोडला जात आहे. मात्र, मतदारसंघांतील विषयांसंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट झाल्याचे नार्वेकरांकडून सांगण्यात येत आहे.

१० तारखेला निकालाची शक्यता

एकीकडे शिवसेनेच्या संदर्भातील निकालाची प्रतीक्षा असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपात्रता याचिकांचे कामकाजही सुरू झाले आहे. त्याचे वेळापत्रकही विधानसभा अध्यक्षांनी जारी केले आहे. त्यानुसार ६ तारखेपासून कामकाज सुरू झाले आहे. राष्ट्रवादीच्या या वेळापत्रकात १० जानेवारीला कोणतेच कामकाज दाखविण्यात आले नाही. त्यामुळे या दिवशी शिवसेनेचा निकाल येण्याची शक्यता आहे. शिवाय मुदतवाढ वगैरेच्या मागणीसाठी आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयातही कोणती विनंती केली गेली नाही. त्यामुळे १० तारखेला निकाल दिला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news