MPSC: रजनीश शेठ एमपीएससीचे नवे अध्यक्ष | पुढारी

MPSC: रजनीश शेठ एमपीएससीचे नवे अध्यक्ष

नवी मुंबई: पुढारी वृत्तसेवा :  राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची आज (दि.१) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली.   त्यांनी आज सकाळी ११ वाजता कोकण भवन येथील एमपीएससीच्या कार्यालयात पदभार स्वीकारला. यापूर्वी या पदाचा अतिरिक्त पदभार सदस्य आणि माजी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे होता. MPSC

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्षासह पाच सदस्य असतात. सदस्यांमध्ये दिलीप पांढरपट्टे, डाॅ. अभय वाघ, डाॅ. संतोष देशपांडे आणि डाॅ. देवानंद शिंदे यांचा समावेश आहे. आयोगाच्या तत्कालीन अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर 19 सप्टेंबर 2023 रोजी निवृत्त झाले. त्यानंतर अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कारभार 25 सप्टेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत सदस्य दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे होता. MPSC

राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरून 31 डिसेंबर रोजी रजनीश शेठ पोलीस सेवेतुन निवृत्त झाल्यानंतर राज्य सरकारने आज नवीन वर्षात नव्याने आयोगाचे रिक्त असलेल्या अध्यक्ष पदाची धुरा रजनिश शेठ यांच्याकडे सोपवली. आज सोमवारी सकाळी रजनिश शेठ यांनी पांढरपट्टे यांच्याकडून पदभार स्वीकारला. कोकण भवन विभागीय आयुक्त कार्यालयालागून असलेल्या भूखंडावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची नवी प्रशासकीय इमारत तयार होऊ घातली आहे. शेठ यांच्या नियुक्तीमुळे आता आयोगाच्या कामाला गती मिळेल.

हेही वाचा 

Back to top button