इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र अत्यंत सुरक्षित : उपमुख्यमंत्री फडणवीस | पुढारी

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र अत्यंत सुरक्षित : उपमुख्यमंत्री फडणवीस

पुढारी ऑनलाईन डेस्क : सरकार आल्यापासून २४ हजार लोकांवर ड्रग्ज प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्राची परिस्थिती इतर राज्यांपेक्षा बरी असल्याने महाराष्ट्र सुरक्षित राज्य असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.२०) दिली. हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली.

विरोधी सरकारला विदर्भाचा विसर पडला होता. पण मी सत्तेत आल्यापासून अनेकांना नागपूरवर प्रेम झाले आहे. खरंतर नागपूरला बदनाम करण्याचं काम विरोधक करत आहेत. 2021 च्या तुलनेत नागपूरमधील गुन्ह्यात घट झाली आहे. बदनामी करुन गुंतवणूकदारांना पळवून लावण्याचं षडयंत्र केलं जात आहे. असे आरोप फडणवीस यांनी यावेळी केले. तसेच ललित पाटीलचा कारखाना महाविकास आघाडीच्या काळात सुरु झाल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

मराठा आरक्षणाबाबत एकूण ५४८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील ३०० हून अधिक गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. तसेच ९० टक्क्यांहून अधिक जणावंर कारवाईचे काम पूर्ण झाले असल्याचे देखील फडणवीस यावेळी म्हणाले.

५५ वर्षांवरील पोलिसांना ८ तासांची ड्युटी करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. आमच्या सरकारमध्ये २३ हजार पदांची पोलीस केली असल्याची माहितीदेखील फडणवीस यांनी दिली.

दिल्ली , मध्य प्रदेश, हरियाणामध्ये गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. मात्र महाराष्ट्राची परिस्थिती या राज्यांपेक्षा बरी असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. यावेळी विविध आकडेवारी सांगत असताना ते म्हणाले की, लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र २० व्या क्रमांकावर, तर शारिरिक शोषणाच्या बाबतीत १६ व्या क्रमांकावर, तर हत्येच्या बाबतीत २० व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे महाराष्ट्र अत्यंत सुरक्षित राज्य असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button