Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाला नाही, मृत्यही नाहीच; विश्वसनीय सूत्रांची माहिती | पुढारी

Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाला नाही, मृत्यही नाहीच; विश्वसनीय सूत्रांची माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर कोणताही विषप्रयोग झालेला नाही. शिवाय, त्याला रुग्णालयातही दाखल करण्यात आलेले नाही. प्रसार माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर सुरु असेलेल्या अफवा विश्वासार्ह गुप्तचर यंत्रणांनी खोडून काढल्या आहेत. १७ डिसेंबर पासून दाऊदवर विषप्रयोग झाल्याची चर्चा सुरु होत्या.

दाऊदबाबतच्या निराधार दाव्यांवर एका पाकिस्तानी युट्युबरने पसरवल्या होत्या. त्याने सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेऊन दाऊदवर विषप्रयोग झाला आणि रुग्णालयात दाखल केल्याचा अंदाज लावला. पाकिस्तानमध्ये इंटरनेटसेवा काही ठिकाणी बंद झाली होती. या प्रकरणाला युट्युबरने दाऊदच्या विषप्रयोगाशी जोडले. दाऊदबाबतचे दावे अधिकृत सूत्रांनी फेटाळले आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button