Sameer Wankhede यांच्या नावावर बार; नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट

Heramb Kulkarni post
Heramb Kulkarni post

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांत अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. आज सकाळी पुन्हा एकदा एक ट्वीट करत मलिक यांनी म्हटले, चलो आज करते है एक और फर्जीवाड़ा पे चर्चा… मिलते है सुबह १० बजे… त्याचबरोबर आणखी एक ट्विट करत त्यांनी सदगुरू रेस्टाे बार नावाच्या एका रेस्टॉरंटचा फोटो शेअर करत नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या बाबतीत गौफ्यस्फोट केला आहे.

गेले काही दिवस मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरण गाजत आहे. या प्रकरणाने राजकीय, प्रशासकीय आणि मनोरंजन क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. आज पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप केला आहे. याअगोदरही नवाब मलिक यांनी समीर यांच्यावर खंडणीखोरी आणि नोकरी मिळवण्यासाठी बनावट जातप्रमीणपत्राचे आरोप केले होते. त्याची चर्चा असतानाचं त्यांनी आज आणखी एक आरोप केला आहे.

Sameer Wankhede नवाब मलिक : वानखेडे यांचा खुलासा

समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या आरोपाचा संदर्भात एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, "माझ्या नावावर बारचा परवाना असणं यात बेकायदेशीर असं काय आहे. मी जेव्हा २००६ साली सरकारी सेवेत आलो तेव्हाचं मी माझ्या स्थावर मालमत्तेची माहिती दिली आहे, त्यात याही मालमत्तेची माहिती नमूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर, या व्यवसायातून येणारा  नफा इन्कम टॅक्स रिटर्नमध्येही दाखवला जातो" असं समीर वानखेडे यांनी म्हंटले आहे.

कुठे आहे बार

सद्गुरू रेस्टॉ बार हा नवी मुंबईतील वाशी येथे आहे. अबकारी खात्याच्या रेकॉर्डनुसार, सद्गुरू रेस्टॉ बारचा परवाना समीर वानखेडे यांच्या नावावर आहे. समीर यांनी भारतीय महसूल सेवेमध्ये (आयआरएस) सेवेत आल्यापासून त्यांनी वडील ज्ञानदेव वानखेडे यांना मुखत्यार पत्र (पॉवर ऑफ अॅटर्नी) दिलं आहे. या रेस्टॉ बारमध्ये विदेशी मद्य व भारतीय बनावटीचं मद्य विकण्याची परवानगी आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news