Share Market : शेअर बाजारात छोट्या गुंतवणूकदारांनी डेरिव्हेटिव्हमध्ये गुंतवणूक का करू नये? NSE च्या सीईओंचा सल्ला | पुढारी

Share Market : शेअर बाजारात छोट्या गुंतवणूकदारांनी डेरिव्हेटिव्हमध्ये गुंतवणूक का करू नये? NSE च्या सीईओंचा सल्ला

दीपक दि. भांदिगरे

पुढारी वृत्तसेवा : तुम्ही मोबाईल, वाशिंग मशीन खरेदी करतेवेळी विचार करता. अभ्यास करता आणि त्यानंतरच खरेदी करता. पण तुम्ही Share Market  मध्ये गुंतवणूक करताना विचार का करत करत नाही. जोखीम आहे की नाही याची माहिती न घेता गुंतवणूक करतात. यामुळे 89 टक्के छोटे गुंतुवणूकदार पैसे गमावतात. यासाठी छोट्या गुंतवणूकदारांनी डेरिव्हेटिव्हमध्ये गुंतवणूक करू नये, असा सल्ला नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ऑफ इंडियाचे MD आणि CEO आशिषकुमार चौहान यांनी दिला आहे. त्यांनी आज (दि. 12) NSE मध्ये पत्रकारांशी संवाद साधला.

छोट्या गुंतवणूकदारांनी कोणतीही जोखीम घेऊ नये. सकाळी Share घेऊन संध्याकाळी विकू नये. हा काही T20 सामना नाही. याला गुंतवणूक म्हणत नाहीत. यात जोखीम आहे. मुलाच्या हातात चाकू असायला नको. साधन आहे पण तुम्हाला ते माहित नाही. त्यात जोखीम घेऊ नका. ज्यात गुंतवणूक करत आहे त्यात जोखीम आहे की नाही. याची तज्ञाकडून माहिती घ्या. पैसे तुमचे आहेत. कंपनी कोणतीही असो. माहिती घ्या. त्यात माहीर झाल्यानंतर गुंतवणूकीकडे वळा. Critical Mind चा वापर का करत नाही? असा सवाल करत NSE ची भूमिका अंपयारची आहे असे चौहान म्हणाले.

भारतीय बाजाराने हॉंगकॉंगला मागे टाकले

NSE मध्ये 8.30 कोटी युनिक नोंदणीकृत गुंतूवणूकदार आहेत. तर NSE वर सुचीबद्ध कंपन्याचे बाजार भांडवल 4 ट्रीलियन् डॉलर असून जगात चौथ्या क्रमांकावर आहे. भारतीय Share बाजाराने होंगकॉंगला मागे टाकले असे, NSE चे सिनिअर Vice President विठ्ठल मोरे यांनी सांगितले.

देशाचा GDP वाढत जाईल तसे बाजारातील बाजार भांडवल वाढत जाईल. बाजारात रिटेल गुंतवणूकदाराचा सहभाग वाढला आहे. NSE च्या सुरवातीला 30 ते 40 लाख गुंतवणूकदार होते. आता 8.30 कोटी गुंतवणूक दार झाले आहेत. अशी माहिती Chief Business Development ऑफिसर श्रीराम कृष्णन यांनी NSE मध्ये दिली.

हेही वाचा

Back to top button