Shiv Sena MLA Disqualification Case : बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाची घटना बनवली; पण पालन केले नाही – उलटतपासणीत राहुल शेवाळेंचा दावा | पुढारी

Shiv Sena MLA Disqualification Case : बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाची घटना बनवली; पण पालन केले नाही - उलटतपासणीत राहुल शेवाळेंचा दावा

गौरीशंकर घाळे : नागपूर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १९९९ साली पक्षाची घटना बनवली. मात्र त्यानंतर त्या घटनेचे पालन करण्यात आले नाही. संघटनात्मक निवडणुका घेण्यात आल्या नाहीत, असा दावा शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. (Shiv Sena MLA Disqualification Case ) शिवसेना आमदार अपात्रता याचिकांवरील सुनावणीला आज (दि. 12 ) सकाळी सुरूवात झाली. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी खासदार राहुल शेवाळे यांची उलटतपासणी घेतली. (Shiv Sena MLA Disqualification Case )

उलटतपासणीतील प्रश्नोत्तरे…

  •  कामत :  तुम्‍ही साक्ष देताना म्‍हणाला की, पक्षाची घटना १९९९ नंतर बदलण्यात आली नाही. तर, उलटतपासणीच्या उत्तरात म्हणालात की, ‘मुख्य नेता पदासाठी घटनादुरूस्ती करण्यात आली. हे परस्परविरोधी विधान नाही का?
  •  शेवाळे : १९९९ ला निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बाळासाहेब ठाकरे यांनी घटना बनविली होती. त्यानंतर पक्ष घटनेचे पालन करण्‍यात आले नाही. म्हणुन जुलै २०२२ रोजी मुख्य नेता पदाची घटनादुरुस्ती निवडणुक आयोगाच्या नियमानुसार केली.
  • कामत :  घटनेचे पालन केले गेले नाही, याचा अर्थ काय ?
  • शेवाळे :  घटनेनुसारच राष्ट्रीय कार्यकारिणी आणि प्रतिनिधी सभेच्या बैठका घ्यायला हव्या होत्या. मात्र, दुर्दैवाने या बैठका झाल्या नाहीत, तसेच पक्षांतर्गत कोणत्या निवडणुकाही झाल्या नाहीत.
  • कामत :  १९९९ मध्ये जेंव्हा बाळासाहेब ठाकरे हयात होते तेंव्हा आणि नंतर कोणत्या संघटनात्मक निवडणुका झाल्या हे खरे आहे का?
  • शेवाळे  : हे खरे नाही.
  • कामत :  म्हणजे १९९९ नंतर निवडणुक आयोगाच्या नियमानुसार संघटनात्मक निवडणुका झाल्या नाहीत, हे खरे आहे का?
  • शेवाळे :  नाही, हे खरे नाही.
  •  कामत : १९९९-२०१२ या काळात नियमानुसार संघटनात्मक निवडणुका झाल्‍या नाहीत.
  • शेवाळे : आयाेगाच्या नियमानुसार या कालावधीत संघटनात्मक निवडणुका झाल्या नाहीत.
  • कामत : मला असे म्हणायचे आहे की, १९९९-२०१२ या काळात  नियमानुसार निवडणुका झाल्‍या,  हे खरे आहे का?
  • शेवाळे : नाही.

हेही वाचा :

Back to top button