राज्यात 13 टक्के लोकांना उच्च रक्तदाब | पुढारी

राज्यात 13 टक्के लोकांना उच्च रक्तदाब

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यात दर 100 पैकी 13 व्यक्ती उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत, तर दर 10 पैकी 2 जण मधुमेहाने ग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून 18 वर्षांवरील लोकांच्या तपासणीत ही बाब समोर आली आहे. स्क्रिनिंगदरम्यान त्रास झालेल्या या लोकांना जिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

‘निरोगी आरोग्य तरुणाचे, वैभव महाराष्ट्राचे’ अंतर्गत 17 सप्टेंबरपासून राज्यात 18 वर्षांवरील वयोगटांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 1 कोटी 14 लाख 60 हजार तरुणांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे. त्यापैकी 1 कोटी 5 लाख 78 हजारांहून तरूणांची सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यापैकी 14 लाख 82 हजारांहून अधिक लोक उच्च रक्तदाबाचे बळी ठरले आहेत. तसेच 2 लाख 35 हजारहून अधिक तरूण मधुमेहाने त्रस्त आहेत. या तपासणीत 15 हजारांहून अधिक लोकांना हायड्रोसेलचा त्रास असल्याचेही आढळून आले. याशिवाय800 हून अधिक लोक सबम्युकस फायब्रोसिसचे बळी ठरले आहेत. यासोबतच 17 लाखांहून अधिक लोकांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत तर 14 हजारांहून अधिक लोकांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, महात्मा ज्योतिबा फुले जनस्वास्थ्य योजना आणि प्रधानमंत्री जन स्वास्थ्य विमा योजनेंतर्गत मोठ्या शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये पाठवले जाईल. या मोहिमेसाठी खास प तयार करण्यात आले आहे. या पच्या माध्यमातून सर्व आरोग्य केंद्रावरील रुग्णांची नोंदणी, त्यांना दिलेली औषधे, उपचार, शस्त्रक्रिया, केलेल्या चाचण्या नोंद आरोग्य कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत केली जाते.

Back to top button