'देवेंद्रजींवर तर बिलकुल भाष्य करू नका', प्रसाद लाड यांचा जरांगे-पाटलांना इशारा | पुढारी

'देवेंद्रजींवर तर बिलकुल भाष्य करू नका', प्रसाद लाड यांचा जरांगे-पाटलांना इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. मंत्री छगन भुजबळ यांच्यानंतर भाजप नेते प्रसाद लाड यांनी जरांगे-पाटलांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. ‘देवेंद्रजींवर तर बिलकुल भाष्य करू नका’, असा इशाराच प्रसाद लाड यांनी जरांगेंना दिला आहे. प्रसाद लाड यांनी जरांगेंना ट्वीटरवरुन प्रत्युत्तर दिले आहे.

मी सांगितलं होतं की राजकीय भाष्य करू नका! – प्रसाद लाड

प्रसाद लाड त्यांच्या ट्वीटरवरील पोस्टमध्ये लिहितात, जरांगे पाटील तुम्ही चुकताय!आपण आत्ता राजकीय भाषा करायल लागलात! लेकरू लेकरू म्हणत, आता राजकीय ढेकरू द्यायला सुरू केलं आहे. जरांगे पाटील आपणाला मी सांगितलं होतं की राजकीय भाष्य करू नका! आणि आदरणीय देवेंद्र जींवर तर बिलकुल भाष्य करू नका!

हेही वाचलंत का?

Back to top button