NCRB Report : राज्यातील नोकरशाही सर्वाधिक भ्रष्ट; सलग तिसर्‍या वर्षीही प्रथम क्रमांकावर बदनाम | पुढारी

NCRB Report : राज्यातील नोकरशाही सर्वाधिक भ्रष्ट; सलग तिसर्‍या वर्षीही प्रथम क्रमांकावर बदनाम

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : देशात सर्वाधिक भ्रष्ट राज्यांच्या यादीत महाराष्ट्रातील नोकरशाही सलग तिसर्‍या वर्षीही प्रथम क्रमांकावर बदनाम असल्याचे चित्र आहे. या आकडेवारीने राज्यातील नोकरशाही भ्रष्टाचाराच्या किडीने पोखरून निघाल्याचे स्पष्ट होत असून, त्याच वेळेला राज्यातील जनता या भ्रष्टाचाराविरुद्ध संतप्त असून, ‘एसीबी’च्या कार्यक्षमतेमुळे तक्रार करण्याचे धाडसही दाखवू लागल्याचे सकारात्मक चित्रही यानिमित्ताने निर्माण झाले आहे.

देशातील सर्वात जास्त भ्रष्टाचार महाराष्ट्रात होत असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे अभिलेख संस्थोच्या अहवालातून समोर आली आहे.
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंडविधानातील (आयपीसी) संबंधित कलमांतर्गत वर्ष 2022 मध्ये देशात सर्वाधिक 749 गुन्हे नोंदवले गेले. 2021 मध्ये हीच आकडेवारी 773, तर 2020 मध्ये 664 अशी होती. 2020, 2021 आणि आता 2022 च्या आकडेवारीचा विचार करता भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत सर्वाधिक गुन्हे या तिन्ही वर्षी महाराष्ट्रात नोंदविण्यात आले आहेत. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आल्यानंतरही दोषींना शिक्षा होण्याचे राज्यातील प्रमाण अतिशय कमी असून, ते चिंताजनक आहे.

Back to top button