Awhad vs Pawar : दादा हा फोटो तुमची ढेरी दाखवतो, आव्हाडांची पोस्ट चर्चेत | पुढारी

Awhad vs Pawar : दादा हा फोटो तुमची ढेरी दाखवतो, आव्हाडांची पोस्ट चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच स्थित्यंतर होवून गेली. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अजित पवार गट बाजुला होत भाजपशी युती करत सत्तेत आले. आता अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात राष्ट्रवादी कोणाची? हा वाद निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. एकीकडे अजित पवार यांचा गट राष्ट्रवादीवर आपला हक्क सांगत आहे. यावरुन अजित पवार आणि शरद पवार गट यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. शरद पवार गटातील जितेंद्र आव्हाड यांनी एक मिश्किल पोस्ट करत अजित पवारांचा फोटो शेअर केला आहे. (Awhad vs Pawar)

फोटो साभार जितेंद्र आव्हाड यांच्या ‘x’ अकाउंटवरुन

Awhad vs Pawar : माझ्या वाढलेल्या पोटाचा

राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) दोन दिवसाच्या निर्धार नवपर्वाच्या वैचारिक मंथन शिबिर रायगडमधील कर्जतमध्ये आयोजित केले होते शुक्रवारी (दि.१) झालेल्या समारोप भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटासंदर्भात बरेच गौप्यस्फोट केले. यानंतर शरद पवार गटाकडूनही त्यांना जोरदार प्रतित्यूर मिळू लागले.  जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. दरम्यान अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या वाढलेल्या पोटाबद्दल वक्तव्य केले होते.

आता जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक फोटो आपल्या ‘X’ अकाउंटवर पोस्ट केली आहे. ही पोस्टची राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर चर्चा होवू लागली आहे. आव्हाडांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,”दादा त्या दिवशी पत्रकार परिषदेत तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला तेव्हा मला वाटले की तुम्ही व्यायाम करुन 6 pack abs केले असतील पण हा पर्वाचा फोटो तुमची ढेरी दाखवतो.. haha…

आता  अजित पवार आव्हाडांच्या या पोस्टला कसे प्रत्यूतर देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहीले आहे.

 

Back to top button