शिंदे 2024 पर्यंत मुख्यमंत्रिपदावर राहणार : प्रकाश आंबेडकर | पुढारी

शिंदे 2024 पर्यंत मुख्यमंत्रिपदावर राहणार : प्रकाश आंबेडकर

मुंबई : महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे हे 2024 पर्यंत कायम राहतील. ते आपला कार्यकाळ पूर्ण करतील, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केला. पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपने चांगला विजय संपादन केला आहे. भाजपचा विजय झाला आहे. हे सत्य आता स्वीकारायला पाहिजे, असेही ते पत्रकार परिषदेत म्हणाले.

भाजपचे राजकीय पतन होत असल्याचे जे बोलले जात होते, ते वस्तुस्थितीला धरून नाही, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले. आंबेडकर म्हणाले, काँग्रेसची राजकीय युती फक्त लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांच्याबरोबर होती. ममता बॅनर्जी यांच्याबरोबर युतीची चर्चा होणार होती. त्यामुळे काँग्रेसची ताकद कमी होईल, असे म्हणता येणार नाही. आम्ही अगोदरपासून इंडिया आघाडीत जाण्यास इच्छुक आहे. आम्हाला इंडियामध्ये घ्या, असे आम्ही म्हणत आहोत. पण, आम्हाला घेण्यास कुणी तयार नाही. तरीही आम्ही इंडिया आघाडीबरोबर जाण्यास तयार आहोत, असेही आंबेडकर म्हणाले.

Back to top button