Biology : बारावीला जीवशास्त्र विषय न घेतलेलेही डॉक्टर होणार | पुढारी

Biology : बारावीला जीवशास्त्र विषय न घेतलेलेही डॉक्टर होणार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा,  ज्या विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या मुख्य विषयांसह १०+२ (बारावी) परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत, त्या विद्यार्थ्यांना आता डॉक्टर होता येणार आहे. नॅशनल मेडिकल कमिशन (एनएमसी) च्या नवीन मार्गदर्शक नियमानुसार कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळामधून बारावीमध्ये अतिरिक्त विषय म्हणून जीवशास्त्र / जैवतंत्रज्ञान विषयासह परीक्षा उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक आहे. (Biology)

देशभरात नीट यूजी या प्रवेश प्रवेशाच्या गुणावरच बीडीएस,बीएएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस आदी अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. एमबीबीएस किंवा बीडीएस करण्यासाठी पात्र होण्यासाठी उमेदवाराने इयत्ता अकरावी आणि बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र/जैवतंत्रज्ञान या विषयांचा दोन वर्षांचा नियमित अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक असल्याचा पूर्वी नियम होता. यावेळी जीवशास्त्र / जैवतंत्रज्ञान किंवा इतर कोणत्याही आवश्यक विषयाचा अभ्यास बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अतिरिक्त विषय म्हणून मान्य केला जात नव्हता. आता नवीन निकषानुसार कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळामधून बारावीमध्ये अतिरिक्त विषय म्हणून जीवशास्त्र / जैवतंत्रज्ञान विषयासह परीक्षा उत्तीर्ण असल्यास त्याला नीट यूजी परीक्षा देता येणार आहे. यामुळे डॉक्टर होण्याची संधी मिळणार आहे. जे विद्यार्थी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र/जैवतंत्रज्ञान आणि इंग्रजीसह बारावी उत्तीर्ण झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांनाही नीट यूजी परीक्षेत बसण्याची परवानगी दिली जाणार आहे. शिवाय, परदेशात शिक्षण घेण्यास इच्छुक उमेदवारांना एनएमसीने दिलेला हा कायदेशीर पुरावा पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रम करण्यास पात्र ठरवणार आहे. नव्या निकषामुळे आता
अतिरिक्त असलेल्या विषयांनाही महत्त्व प्राप्त झाले आहे.

विद्यार्थी वाढण्याची शक्यता

सध्या देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या १.०४ लाख जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी ५४ हजार जागा या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील आहेत. बीडीएसमध्ये २७ हजार ८०० पेक्षा जास्त जागा आहेत. ५२ हजार ७०० आयुष अभ्यासक्रमांच्या आहेत. गतवर्षी २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी देशभरातून अर्ज करतात. यंदा ज्या विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा जैवतंत्रज्ञान या विषयाचा इंग्रजीसह मान्यताप्राप्त मंडळातून अतिरिक्त विषय म्हणून अभ्यास केला आहे ते नीट परीक्षेला बसू शकणार आहेत. त्यामुळे आणखी विद्यार्थी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा 

Back to top button