पुढारी ऑनलाईन डेस्क : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो शेअर करत ते मकाऊ येथे जुगार खेळत असल्याचा गंभीर आरोप करत निशाणा साधला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांना पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण दिले आहे. (Raut Vs Bawankule)
संजय राऊत यांचा आरोपांचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी आपल्या 'X' खात्यावरुन पोस्ट करत म्हटलं होतं की,"मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे."
संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आपल्या 'X' खात्यावर सलग तीन पोस्टसह बावनकुळेंचे फोटो शेअर करत जुगाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आपल्या पहिल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "महाराष्ट्र पेटलेला आहे. आणि हे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत. फोटो zoom करुन पहा.ते तेच आहेत ना? पिक्चर अभी बाकी है…" तर पुढील पोस्ट करत त्यांनी म्हटलं आहे की,"19 नोव्हेंबर मध्यरात्री, मुक्काम पोस्ट: मकाऊ, veneshine. साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले, असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना?" तिसरी पोस्ट करत म्हटलं आहे की,"ते म्हणे फॅमिलसह मकाऊ ला गेले आहेत. जाऊ द्या. त्यांची सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणे. कधीच जुगार खेळले नाहीत; मग ते नक्की काय करीत आहेत? झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय!"
हेही वाचा