Bandra LPG Gas Cylinder Blast : बांद्रा येथे सिलिंडरचा स्फोट; ८ जण जखमी | पुढारी

Bandra LPG Gas Cylinder Blast : बांद्रा येथे सिलिंडरचा स्फोट; ८ जण जखमी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: बांद्रा येथे शनिवारी (दि.१८) पहाटे सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीमध्ये ८ जण जखमी झालेत. जखमींना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली आहे. अशी माहिती बीएमसीने दिली आहे. (Bandra LPG Gas Cylinder Blast)

मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी १८ नोव्हेंबर रोजी पहाटे ६.१९ वाजता फिटर गल्लीतील गझदर बांध रोड, बांद्रा येथे सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे आग लागली. आगीमध्ये तळ आणि पहिल्या मजल्यावरील इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक सामान, साठवून ठेवलेले कपडे जळून खाक झाले आहेत. (Bandra LPG Gas Cylinder Blast)

आगीच्या ठिकाणी अग्निशमन दलाने धाव घेत ६.४० वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.  या आगीत ८ जण गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्वजण आगीमुळे २५ ते ४० टक्के भाजले आहेत. त्यांच्यावर सर्जिकल वार्डमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशसाकडून देण्यात आली आहे. (Bandra LPG Gas Cylinder Blast)

Bandra LPG Gas Cylinder Blast: जखमींची माहिती

१ – निखिल दास, ५३ वर्षे, ३५ टक्के भाजला
२ – राकेश शर्मा, ३८ वर्षे, ४० टक्के भाजला
३ – अँथनी थेंगल, ६५ वर्षे, ३० टक्के भाजला
४ – कालीचरण कानोजिया, ५४ वर्षे, २५ टक्के भाजला
५ – शान अली झाकीर अली सिद्दीकी, ३१ वर्षे, ४० टक्के भाजला
६ – समशेर, ५० वर्षे, मोठ्या प्रमाणात भाजला
७ – संगीता, ३२ वर्षे, कमी प्रमाणात भाजली
८ – सीता, ४५ वर्षे, रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला

हेही वाचा:

Back to top button