मुंबई : पुढारी वृत्तसेवा नागपूर या होम पिचमधूनच आपण विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जाहीर केले. त्यामुळे ते लोकसभा निवडणुक लढविणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
फडणवीस आता केंद्रात जाणार असून, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार, अशा चर्चा सुरू आहे. त्यावर फडणवीस म्हणाले, मला अद्याप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून बोलावणे आलेले नाही. मी महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रातच राहणार आहे. मी मुंबईतून लोकसभा नव्हे, तर नागपुरातूनच विधानसभेची निवडणूक लढवणार आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
महाराष्ट्रामध्ये राजकारणात अद्यापही कोण कोणाचा हाडवैरी नाही. अजूनही महाराष्ट्रातील राजकारण मारामारीच्या पातळीवर किंवा हिंसक पातळीवर उतरलेले नाही. त्यामुळे दिवाळीच्या काळात आनंदाचे आणि उत्साहाचे फटाके आपण फोडतो. तसेच राजकीय फटाके फोडणार नाही. या काळात सर्वच पक्षांच्या नेत्यांना आपण दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही शुभेच्छा दिल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :