Mumbai Fire | मुंबईच्या भायखळामधील इमारतीला आग, ५ जणांना वाचवले | पुढारी

Mumbai Fire | मुंबईच्या भायखळामधील इमारतीला आग, ५ जणांना वाचवले

पुढारी ऑनलाईन : भायखळा परिसरातील एका इमारतीला आग लागली आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या दाखल झाल्या आहेत. दरम्यान, ज्या इमारतीला आग लागली आहे त्यातून पाच जणांना वाचवण्यात आले आहे. आग विझवण्याचे काम सुरू आहे. अद्याप कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. (Mumbai Fire)

दरम्यान, ठाण्यातील भिवंडी परिसरातील धाग्याच्या गोदामाला काल रात्री भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेने दिली आहे.

Back to top button